Uncategorized

पंढरपुरात मॉल आगीच्या भक्ष्यस्थानी

backup backup

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा शहरातील स्टेशन रोडवरील भरवस्तीतील कॉटन एक्स्पो या मॉलला शॉर्ट सर्किट आग लागली. शुक्रवारी (दि. 17) दुपारी एक वाजता ही दुर्घटना घडली. यामध्ये संपूर्ण मॉल जळून खाक झाला. मॉलमधील रेडिमेड कपडे, चप्पल, संसारोपयोगी वस्तू आदी साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या दरम्यान तेथील व्यवस्थापक व कामगार शटर बंद करू भोजनासाठी गेल्याने जिवीत हानी टळली.

पुण्यातील शफी शेख यांनी सोलापुरात येथील स्टेशन रोडवर भाड्याने कॉटन एक्स्पो हा मॉल सुरु केला होता. हा सेलरूपी मॉल उभारला आहे. यामध्ये रेडिमेड कपडे, चप्पलसह संसारोपयोगी साहित्य रॅक करून बसविण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजता व्यवस्थापकासह कामगार जेवणासाठी शटर बंद करून निघून गेले होते. याच दरम्यान अचानक शॉर्टसर्किट होऊन मॉलमध्ये आग लागली. कपडे, लेदर, प्लास्टिकसह अन्य जळाऊ साहित्य असल्याने आग भडकत गेली. यावेळी धुराचे लोट आकाशात दिसू लागल्याने शहरातील नागरिकांनी आगीकडे धाव घेतली. बघ्यांनी प्रचंड मोठी गर्दी केली होती.

आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाने बंबासह धाव घेतली. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान शहर पोलीस दाखल झाले. त्यांना नागरिकांना हटविण्याचे काम करावे लागले. अखेर तासभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. तोपर्यंत सर्व साहित्य जळून खाक झाले होते. दरम्यान, या आगीत किती नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नाही. दुकान मालकाने रितसर फिर्याद दिल्यानंतरच नुकसानीचा आकडा समजू शकेल, असे अग्निशमन विभागाने सांगितले.

सतर्कतेमुळे मोठी हानी टळली

अग्निशामन दलाने शर्थीचे प्रयत्न करीत आग विझवली. पण दुर्दैवाने सर्व सहित्य जळून खाक झाले. व्यवस्थापक व कामगार जेवायला गेल्याने त्यांचे प्राण वाचले. या मॉलला लागूनच हॉटेल, अन्य व्यावसायिक दुकाने, ऑफिस, निवासस्थाने आहेत. सुदैवाने आगीची झळ त्यांना पोहोचू दिली नाही. त्यामुळे मोठी हानी टळली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT