Uncategorized

विमला आर. यांची नागपूर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्हाधिकारी म्हणून श्रीमती आर. विमला यांनी शनिवारी पदभार स्वीकारला. नागपूर जिल्ह्याचे मावळते जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांची बदली करून राज्य सरकारने त्यांच्या जागी आर. विमला यांची नियुक्ती केली आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळविणे आणि जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती देणार असल्याचे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आज सकाळी येथे पदभार स्विकारल्यानंतर सांगितले.

श्रीमती आर. विमला या २००९ च्या तुकडीच्या आयएएस अधिकारी आहेत. कोकणात उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात केली. यापूर्वी राज्य ग्रामीण आजीविका मिशन (एमएसआरएलएम) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्या कार्यरत होत्या.

श्रीमती विमला यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यात लघु उद्योग उद्योग विकास महामंडळाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, करमणूक शुल्क आणि प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन उपायुक्त आणि दादासाहेब फाळके फिल्म सिटीच्या सहव्यवस्थापक संचालक आदी पदांचा समावेश आहे. राज्यातील मनरेगाच्या अंमलबजावणीतही त्यांनी उपसचिव म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

महिला सशक्तीकरणाच्या कार्यात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. ग्रामीण महाराष्ट्रात महिला सबलीकरणासाठी त्यांनी २०१६ पासून कार्य केले आहे.

एमएसआरएलएमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विमला यांनी स्वयं-सहायता गट (एसएचजी) आणि समुदाय-आधारित संस्थांच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात बदल घडवून आणविले आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT