Uncategorized

नांदेड-पुणे एक्स्प्रेसला 17 जुलैपर्यंत वेटिंग

सोनाली जाधव

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : नांदेड -पुणे एक्स्प्रेस प्रवाशांसाठी सोयीची ठरत असल्याने तिला पहिल्या दिवसापासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबादकरांना ही एक्स्प्रेस मोठी पर्वणी ठरली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस गाडीला गर्दी वाढत आहे. ही गाडी सुरू होऊन पाचच दिवस उलटले, तरी वेटिंगला सुरुवात झाली आहे. या गाडीला 17 जुलैपर्यंत वेटिंग असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

नांदेडसह औरंगाबाद येथून पुणे येथे जाणार्‍यांची संख्या सर्वाधिक आहे. या मार्गावर ट्रॅव्हल्स आणि एसटीच्या बसशिवाय प्रवाशांना पर्याय नव्हता. त्यातच एसटीसह ट्रॅव्हल्सचे वाढलेले दर पाहता प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. नांदेडहून पुण्यापर्यंत रेल्वे सुरू करावी अशी मागणी अनेक वर्षांपासूनची होती. अखेर या मार्गावर रेल्वे सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या रेल्वेला पहिल्या दिवसापासूनच प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळला आहे. दिवसेंदिवस प्रवाशांची गर्दी वाढत असल्याने या एक्स्प्रेला 17 जुलैपर्यंत वेटिंग आहे.

SCROLL FOR NEXT