Uncategorized

नगर : संगमनेरात दोघे लाचखोर रंगेहाथ चुर्तभूज

अमृता चौगुले

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : संगमनेर येथील महावितरण कंपनीच्या आउटसोर्सिंग कर्मचार्‍यांचा पगार करण्यासाठी एका इलेक्ट्रिकल्स् कंपनीच्या दोन कर्मचार्‍यांना तक्रारदारकडून 3 हजार रुपयांची लाच घेताना एका महिला व एक पुरुष अशा दोघा कर्मचार्‍यांना अ. नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस पथकाने आज (बुधवारी) दुपारी रंगेहाथ पकडले.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक पो. नि. शरद गोर्डे म्हणाले, संगमनेर येथील महाराष्ट्र राज्य वीज विरतण कंपनीच्या वतीने आउटसोर्सिंग कर्मचार्‍यांना एका कंपनीने नोकरी दिली. त्यांचे पगार येथील एक ईलेक्ट्रीकल्स कंपनी करीत होती. एका कर्मचार्‍याचा पगार थकला. त्याने कार्यालयात पगार मागितला असता सुपरवायझर सुनील पर्बत व सुजाता कांबळे – पगारे यांनी 3 हजार लाच मागणीतली. अ. नगरचे लाच लुचपतचे पो. उपाधीक्षक हरीश खेडकर व विभागाचे पोलिस अधिक्षक सुनील कडासणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. डॉ. शरद गोर्डे यांच्या पथकाने कारवाई केली.

SCROLL FOR NEXT