Uncategorized

सोलापूर : धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह दोन्ही गटांच्या 8 जणांवर गुन्हा दाखल

backup backup

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा विजय पतसंस्थेचे थकीत कर्ज मागण्यासाठी गेलेल्या कर्मचार्‍याला जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी अकलूज पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर विरोधी गटाकडून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून धमकावत मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. यात भाजपचे जिल्हा संघटनमंत्री धैर्यशील मोहिते-पाटील यांचा समावेश आहे. हा प्रकार गुरुवारी घडला. संतोष आयवळे यांच्या फिर्यादीवरुन सोमनाथ हुलगे, त्याचा लहान भाऊ नागेश हुलगे, राहुल ढेरे, साजीद सय्यद यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे तर सोमनाथ हुलगे याच्या फिर्यादीवरुन धैर्यशील मोहिते-पाटील, काका जगदाळे, संतोष आयवळे, राहुल उर्फ बंटी जगताप यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

विजय पतसंस्थेचे वसुली कर्मचारी संतोष बापू आयवळे यांच्या फिर्यादीनुसार 21 जुलै रोजी माळीनगर येथील सोमनाथ हुलगे यांच्याकडे रिक्षा खरेदीसाठी सन 2003 साली घेतलेल्या थकीत कर्जाची रक्कम मागण्यासाठी गेले होते. स्वामी समर्थ इडली गृहजवळ आल्यावर त्यांना हुलगेसह चौघांनी जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच खिशातील साडेसात हजार रुपये काढून घेतले. जीवे मारण्याची धमकी दिली. अशी नोंद अकलूज पोलिस ठाण्यात करण्यातआली आहे. या गुन्ह्याचा तपास उपअधीक्षक शिवपुजे करीत आहेत. तर सोमनाथ अंकुश हुलगे (रा. माळीनगर ) यांच्या फिर्यादीनुसार त्यांनी 2003 साली रिक्षा खरेदी करण्यासाठी घेतलेल्या एक लाख कर्जापैकी 20 हजार रुपये भरले होते. त्यानंतर 2019 मध्ये अ‍ॅटोरिक्षा भंगारात विक्री केली. त्यावर पतसंस्थेची 6 लाख 80 हजार इतकी रक्कम मुद्दल व व्याजासहित झाली.

कर्जाची परतफेड केली नाही म्हणून हुलगे विरोधात न्यायालयात कर्ज वसुलीचा दिवाणी दावादेखील सुरू आहे. पतसंस्थेचे वसूलदार संतोष आयवळे यांनी कर्जाच्या रकमेची तडजोड करण्यासाठी त्यांना 21जुलै रोजी दुपारी रोजी दुपारी तीन वाजता शिवशंकर बझारजवळ असलेल्या त्यांच्या कार्यालयात बोलवून घेतले. त्यावेळी एक लाख रुपये आयवळे यांच्याकडे दिले. त्याठिकाणी असलेले भाजपचे संघटनमंत्री धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या सांगण्यावरुन काका जगदाळे यांनी मारहाण केली. माझ्या गळ्यातील एक तोळ्याची चेन त्यांनीच काढून घेतली. त्यानंतर संतोष आयवळे, राहुल उर्फ बंटी जगताप यांनीही मारहाण केली, अशी फिर्याद अकलूज पोलिसांत दिली आहे. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून धमकावल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक चौधरी पुढील तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT