Uncategorized

‘दिव्य प्रेरणा ज्योत’चे जल्लोषी स्वागत

Shambhuraj Pachindre

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

चौंडी ते गुळवंची 'प्रेरणा ज्योत'चे अनेकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 297 व्या जयंतीनिमित्त गुळवंची (ता. उत्तर सोलापूर) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'दिव्य प्रेरणा ज्योत'चे अनेक ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा गौरव व्हावा तसेच त्यांच्या कार्याची प्रेरणा सर्वांना व्हावी यासाठी मंडळाचे अध्यक्ष विलास खताळ, मल्हारी डोंबळे, मनौद्दीन पठाण, अमोल पांढरे यांच्या संकल्पनेतून चौंडी ते सोलापूर या 'प्रेरणा ज्योत'चे आयोजन करण्यात आले होते. या ज्योतचा शुभारंभ अहिल्यादेवीचे वंशज माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.त्यानंतर कुर्डूवाडी येथे माजी सभापती संजय पाटील-घाटणेकर यांनी स्वागत केले.

मोहोळ येथे भाजपचे नेते संजय क्षीरसागर यांनी या 'प्रेरणा ज्योत'चे स्वागत केले. सांगली जिल्हा बँकेचे संचालक अ‍ॅड. चिमण डांगे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत मंडळाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. ही 'प्रेरणा ज्योत' सतात्याने अहिल्यादेवी यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करुन देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी सुशील क्षीरसागर उपस्थित होते. त्यानंतर गुळवंची येथे या 'प्ररेणा ज्योत'चा समारोप पांडुरंग भोसले, भारत भोसले, मल्हारी बोराडे, कुमार नवगिरे, बबन पवार, हणमंत माने, बाबा भोसले, रहीम पठाण, अनंत कोरके आदींच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT