Uncategorized

तुळजापूर : ‘अग्‍निपथ’ रद्द करण्याची तुळजापूर राष्ट्रवादीची मागणी

दिनेश चोरगे

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने सैनिक भरतीसाठी जाहीर केलेली अग्‍निपथ योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस तुळजापूरच्या वतीने पंतप्रधानांना तुळजापूर तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले.

ही योजना तरुणांच्या भवितव्याला अंधारात लोटणारी आहे, त्यामुळे ही योजना तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष अमर चोपदार यांच्या शिष्टमंडळाने केली आहे. केंद्र शासनाने सैनिक भरतीसाठी अग्‍निपथ योजना सुरु केली आहे. परंतु या योजनेमुळे पूर्वी सैन्य भरतीसाठी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे व युवकांचे नुकसान होणार असून, त्यांच्यावर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळणार आहे.

या योजनेंतर्गत युवकांना चार वर्षांनी सेवानिवृत्त करुन आणखी बेरोजगार होऊन इतर समस्यांना तोंड द्यावे लागणार असून यामुळे ही अग्‍निपथ योजना म्हणजे बेरोजगारी पथ योजना आहे. ती तत्काळ रद्द व्हावी. रद्द न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस तुळजापूरच्या वतीने पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनाद्वारे म्हटले आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, विधानसभा अध्यक्ष गोकुळ शिंदे, शफी शेख, विजय सरडे, खंडू जाधव, दिलीप मगर, शहराध्यक्ष अमर चोपदार, अल्पसंख्याक जिल्हा कार्यध्यक्ष तोफीक शेख, युवक जिल्हा कार्यध्यक्ष विवेक शिंदे, युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे, कार्यध्यक्ष शरद जगदाळे, अक्षय परमेश्‍वर, आकाश शिंदे, गणेश नन्नवरे, गोविंद देवकर, महेश माळी, वाहेद शेख, रोहित चव्हाण, समर्थ पैलवान उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT