Uncategorized

पंढरपूर : तलवार हल्ल्यात महिलेचा हात तुटला

backup backup

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा अनैतिक संबंधाच्या संशयावरून चौघांनी संशयित तरुणाला स्मशानभूमी येथे बोलावून घेऊन रागाच्या भरात तलवार व कुर्‍हाडीने हल्ला करत असताना तरुणाच्या आईने स्वत:च्या हातावर तलवारीचा वार घेतल्याने हात मनगटापासून तुटून पडला आहे. ही घटना गुरुवार, 28 जुलै रोजी सकाळी 9 वाजता घडली आहे. याबाबत पंढरपूर तालुका पोलिसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, खर्डी येथील संतोष रणदिवे याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपींना होता. त्यामुळे आरोपी रामदास सर्जेराव कांबळे, सीताराम सर्जेराव कांबळे, हरिदास सर्जेराव कांबळे (सर्व रा. खर्डी), तर संतोष तायाप्पा उकरंडे (रा. इंदापूर) यांनी भांडण मिटवण्यासाठी संतोष रणदिवे याला स्मशानभूमी येथे बोलावून घेतले.

तत्पूर्वी आरोपी सीताराम कांबळे याने कुर्‍हाड, तर संतोष उकरंडे याने तलवार घेऊन अगोदरच खुनी हल्ला करण्याची तयारी केली होती. संतोष रणदिवे स्मशानभूमी येथे आला असता आरोपींनी शिवीगाळ सुरू केली. दरम्यान, रामदास कांबळे याने संतोष रणदिवे याच्यावर वार करण्यासाठी तलवार उगारली असता संतोषची आई जयश्री रणदिवे यांनी हात मध्ये घातला. त्यामुळे संतोषवर होणारा तलवारीचा वार त्याच्या आईच्या हातावर बसला. या तलवार हल्ल्यात जयश्री यांचा हात मनगटापासून तुटून बाजूला पडला. या घटनेत जयश्री या रक्तबंबाळ होऊन आरडाओरडा करू लागल्या. त्यामुळे लोक जमा झाले. त्यांनी भांडण सोडवासोडवी केली. आरोपींना जमावाने चांगलाच चोपही दिला. जखमी जयश्री रणदिवे यांना तत्काळ उपचाराकरिता खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. याप्रकरणी रामदास कांबळे, सीताराम कांबळे, हरिदास कांबळे, संतोष उकरंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. मात्र, या घटनेने खर्डी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT