Uncategorized

गुरुराघवेंद्र नगरात 70 हजारांची जबरी चोरी

दिनेश चोरगे

सोलापूर ः रिक्षाचालकाच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवून 70 हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेल्याप्रकरणी चौघांविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कोंडीबा बालाजी कानसाळे (वय 32, रा. घर नं. 137, गुरु राघवेंद्र नगर, मुळेगाव रोड, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वादीद बशीर शेख, सोहेल बाबू शेख, मुज्जा व अल्ताफ यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

11 जून रोजी रात्रीच्या सुमारास कोडींबा कनसाळे यांच्या घरातील सर्वजण झोपले होते. त्यावेळी पहाटेच्या दोनच्या सुमारास वादीद शेख व त्याच्या साथीदारांनी कनसाळे यांच्या घरात प्रवेश करून कोंडीबाच्या आईस चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ व कपाटातील रोख रक्‍कम असा 70 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला.

यावेळी वादीद शेख व त्याच्या साथीदारांनी पळून जाताना कनसाळे याची दुचाकी घेऊन गेले व ती जाळून टाकून नुकसान केले. म्हणून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक चौधरी पुढील तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT