Uncategorized

गजानन महाराज पालखीचे सोलाळपुरात आगमन

backup backup

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा 'गण गण गणात बोते' आणि विठुनामाचा जयघोष करीत शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे शनिवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील सायंकाळी उळे येथे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले.जिल्हा प्रशासनाच्या वतीने यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पालखीचे दर्शन घेऊन वारकर्‍यांचे भक्तिभावात स्वागत केले.

यावेळी प्रांत अधिकारी हेमंत निकम, प्रांत अधिकारी सुमित शिंदे, उळे गावचे सरपंच अप्पा धनके, जि.प.सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अमोल कुंभार, मंडळ अधिकारी चंद्रकांत हेडगिरे, सुखदेव पाटील, जगदीश धनुरे यांच्यासह वारकरी उपस्थित होते. पालखीचा मुक्‍काम उळे (ता. दक्षिण सोलापूर) येथे असून रविवारी सकाळी पालखी सोलापूर शहरात प्रवेश करणार आहे. त्याअनुषंगाने उळे येथे जय्यत तयारी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT