Uncategorized

खा. संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते : संजय शिरसाट

दिनेश चोरगे

औरंगाबाद : सध्या राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना चालवत आहे. संजय राऊत हे त्यांच्या शिवसेनेचे नाही तर शरद पवारांचे प्रवक्ते आहेत. ज्या दिवशी शिवसेना संपेल, त्या दिवशी संजय राऊत हे शरद पवारांच्या मांडीवर बसलेले दिसतील, अशा शब्दांत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी रविवारी निशाणा साधला. विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप केला जात आहे. त्याला आता सत्ताधारी शिंदे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे.

शिरसाट म्हणाले, तुमची सत्ता होती तेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टींची चौकशी केली नाही. उलट एकनाथ शिंदे यांना त्रासच दिला. आता आमचे सरकार आहे, ते वेगाने काम करत आहेत. त्यांचा झंझावात सुरू असल्यानेच त्यांच्यावर खोटेनाटे आरोप केले जात आहेत.

SCROLL FOR NEXT