सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : खत विक्री केंद्रात खत उपलब्ध असतानादेखील शेतकर्यांना खत का मिळत नाही. तसेच चढ्या भावाने खत विक्री होत असल्याच्या तक्रारीवरून आमदार अब्दुल सत्तार यांनी कृषी अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले होते. बोगस बियाणे, खतांचा साठा करून चढ्या भावाने विक्री करणार्यांवर कारवाई करा असे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी दिले होते. त्याअनुषंगाने पंचायत
समितीचे कृषी अधिकारी एस. व्ही. भालेराव यांनी सर्व खत विक्री केंद्राला नोटीस बजावली आहे. खत उपलब्ध असताना विक्री न करणे , लिंकिंग करणे, तसेच चढ्या भावाने विक्री करणे इत्यादी बाबींविषयी लेखी अथवा तोंडी तक्रार प्राप्त झाल्यास अशा केंद्राचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याचे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. तालुक्यात ज्या भागात पाऊस झाला तेथील पेरण्या शेतकर्यांनी आटोपल्या. आता पिके उगवून आल्याने शेतकर्यांना खतांची गरज भासत आहेत. मात्र शेतकर्यांना आवश्यक खत मिळत नव्हते. तर काहींनी चढ्या भावाने खत मिळत असल्याचे सांगितले. त्याअनुषंगानेआमदार अब्दुल सत्तार यांनी याबाबत आढावा घेवून शासकीय अधिकार्यांना निर्देश दिले होते. तर तक्रार नोंदवावी शेतकर्यांना खतांचा तुटवडा भासणार नाही याबाबत अधिकार्यांना सूचना देण्यात
आलेल्या आहेत. खत उपलब्ध असतानादेखील खत विक्रेता खत देत नसेल किंवा चढ्या भावाने खत देत असेल तर याबाबत शेतकर्यांनी तालुका कृषी अधिकारी , तहसीलदार यांच्याकडे लेखी किंवा तोंडी तक्रार करावी जेणेकरून असा प्रकार करणार्यांवर कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले