Uncategorized

खंडाळा बोर घाटात बसला अपघात

अमृता चौगुले

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर खंडाळा बोर घाटात शिंगरोबा मंदिराजवळ बस उलटून झालेल्या अपघातात चालकासह सतरा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हे सर्वजण हैदराबाद येथील एका आयटी कंपनीचे कर्मचारी आहेत. ते चौक जवळील इर्शाळ गड इथे फिरायला निघाले होते. जखमींवर खोपोली पालिका तसेच पवना रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

खोपोली इथे शिंगरोबा मंदिरापाशी तीव्र उतार आणि अवघड वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. घटनेचे वृत्त समजताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिस यंत्रणा तसेच आयआरबीच्या कर्मचार्‍यांनी अपघातग्रस्त बस बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली. या अपघाताचा पुढील तपास खोपोली पोलिस करीत आहेत.

SCROLL FOR NEXT