Uncategorized

कुर्डूवाडी : मतदार यादीवर हरकतींचा पाऊस

backup backup

कुर्डूवाडी : पुढारी वृत्तसेवा येथील शहरातील नगरपरिषद याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नावांची अदलाबदल असल्याने मतदार यादीवर हरकतीचा पाऊस पडला आहे. किमान 3 हजारपेक्षा जास्त नागरिकांच्या नावांची अदला बदल प्रत्यक्ष प्रभाग सोडून झाल्याचा अनुमान आहे. नगपालिका मतदार यादीत ग्रामीण भागातील नागरिकांची नावे दिसून आली तर अनेक ठिकाणी एकाच मतदाराचे नाव वेगवेळ्या प्रभागात आढळून आलेे आहे. सोमवार, दि 27 रोजी हरकतीच्या शेवटच्या दिवशी सायं. 5 पर्यंत 310 हरकती दाखल झाल्या असून हरकती दाखल करण्याचे काम सुरुच होते. एका हरकतीत एक ते सातशे मतदारांच्या हरकती आहेत.

साधारण 2 हजार मतदारांच्या नावाच्या हरकती दाखल झाल्या आहेत. नगरपालिका इतिहासातील हरकतीचा हा उच्चांक आहे. दरम्यान, रिपाइं (आठवले) गटाकडून राज्य निवडणूक आयोगास निवेदन देण्यात आले असून प्रभाग 1 ते 4 मध्ये इतर प्रभागातील नावे जाणीवपूर्वक घातली आहेत. हे प्रभाग मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव आहेत तरी तत्काळ अतिरिक्त नावे कमी करावीत. अन्यथा, गंभीर परिणामास समोर जावे लागेल असे निवेदनात नमूद केले आहे. वेळेच्या व प्रत्यक्ष कागद पत्राच्या अभावामुळे अनेक हरकती दाखल होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे सदर प्रक्रियेसाठी वेळ वाढवून मिळावा, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.

जर काही मतदारांची नावे इतर वॉर्डांमध्ये गेली असतील तसेच त्यांनी हरकत घेतलेली असेल तर प्रत्यक्ष त्यांच्या घरी नगरपालिकेचे कर्मचारी जाऊन त्यांची चौकशी करणार आहेत. त्याअनुषंगाने त्यांची नावे पूर्ववत त्यांच्या मतदार संघात घेण्यात येतील.
– लक्ष्मण राठोड, मुख्याधिकारी, कुर्डूवाडी नगरपालिका.

SCROLL FOR NEXT