Uncategorized

कुरुल परिसरात वादळी पाऊस; पपई बाग जमीनदोस्त

backup backup

कुरुल : पुढारी वृत्तसेवा कुरुल (ता. मोहोळ) परिसरात गुरुवार, 9 जून रोजी रात्री आठ वाजता वादळी वार्‍यासह जोरदार पावसास सुरूवात झाली. या पावसामुळे कुरूलसह परिसरात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. याचा सर्वाधिक फटका, पपई,केळी, डाळिंब, शेवगा आदी फळबागांना बसला आहे.

वादळी वार्‍यामुळे कुरुल परिसरातील केळी व पपईचा बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. मोठ-मोठी वृक्ष वार्‍यामुळे पडले आहेत. आधीच अडचणीत आलेल्या बळीराजाचं यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कोरोनामुळे आधीच शेतकरी मेटाकुला आला होता, शेतकर्‍यांच्या पिकांना योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते.

मात्र, आता कुठे चांगले पीक येत असताना अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, झालेल्या नुकसानाची त्वरित पाहणी करून शेतकर्‍यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

पीक घेण्यासाठी रासायनिक खताची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर असते. रासायनिक खतांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे शेतकर्‍यांनी कर्ज काढून पिके जोपासली होती. आता वादळी वार्‍यामुळे माझी पपईची बाग भुईसपाट झाली आहे. शासनाने नुकसानाची त्वरित पाहणी करून मदत करावी.
– सोमनाथ तोडकर, शेतकरी, मोहोळ

SCROLL FOR NEXT