Uncategorized

कांदा, लसणाचे दर घसरले

backup backup

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा चेन्नई, तामिळनाडू, केरळ या राज्यांतील बाजार समित्यांमधील कांद्याच दर घसरल्याने सोलापूरच्या बाजारातील कांद्याचे दरदेखील घसरले आहेत. त्यामुळे अगदी कवडीमोल दराने कांद्याची विक्री शेतकर्‍यांना करावी लागत आहे. सध्या नवीन कांद्याची लागवड सुरू झाली आहे. बाजारातील जुन्या कांद्याचा दर मात्र खूपच कमी झाला आहे. त्यामुळे अगदी कवडीमोल दराने शेतकर्‍यांना कांद्याची विक्री करावी लागत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज 40 ट्रक कांद्याची आवक येत आहे. या कांद्याचा दर प्रति क्विंटल 200 ते 1500 रुपये इतका आहे. हा कांदा स्थानिक शेतकर्‍यांसह बीड जिल्ह्यातील कांदा बाजारात येत आहे. नवीन कांद्याची सध्या शेतकरी लागवड करीत आहेत. त्यामुळे जुन्या कांद्याचे दर वाढण्याऐवजी कमी होत आहेत. नवीन कांदा येण्यासाठी आणखी दोन ते अडीच महिने लागणार आहेत.

मात्र बाजारातील या कांदा दराचा शेतकर्‍यांचा लागवड खर्चही निघत नाही.
सोलापूरच्या बाजारातील कांदा हा कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये जात आहे. चेन्नई, केरळ आणि तामिळनाडू येथील बाजारांतील कांद्याचे दर खूपच कमी झाले आहेत. त्यामुळे कांद्याचे बाजारातील दर कमी झाल्याची माहिती अडत दुकानदार सादिक बागवान यांनी सांगितले.

लसूण पन्नास रुपयांना दोन किलो

एकीकडे कांद्याचे दर कवडीमोल झाले असताना लसणाचे दरही घसरले आहेत. किरकोळ बाजारात लसूण 50 रुपयांना दोन किलो मिळत आहे. लिलावात लसणाचा दर प्रती क्विंटल 1100 ते 3600 रुपये इतके आहेत. त्यामुळे तेजीत असलेले लसूण हे कमी दराने मिळत असल्यामुळे ग्राहकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

SCROLL FOR NEXT