औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : पेट ?ोल-डिझेलऐवजी पर्यावरणपूरक इंधन म्हणून सीएनजीच व एलपीजी गॅस या इंधनांचा वापर करण्यासाठी जनजागृती केली जात आहे, तर दुसरीकडे या इंधनाची होणारी दरवाढ नागरिकांवर आर्थिक बोजा टाकत आहे. सातत्याने होत असलेल्या दरवाढीने सीएनजीने आता डिझेललाही मागे टाकले आहे.
सीएनजी गॅसचे दर आता शंभरीजवळ येऊन ठेपले आहेत, तर एलपीजी गॅसच्या दरात होणारी घट सर्वसामान्यांसाठी
दिलासा देणारी आहे.
गेल्या काही वर्षांत सीएनजी इंधनाच्या वाहनांना पसंती दिली जात आहे. पेट ?ोल-डिझेलसह सीएनजीची सुविधा असलेली वाहने खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. पेट ?ोल पंपांची संख्या पाहता, सीएनजी पंप कमी आहेत. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असे चित्र सीएनजी पंपावर दिसून येते. असे असताना सीएनजी गॅसच्या दरात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढ होत आहे.
एप्रिल-2022 मध्ये 77 रुपये किलो असे दर असलेल्या सीएनजीच्या दराचा आलेख वाढतच गेलेला आहे. ऑगस्टमध्ये 91 रुपये, सप्टेंबरमध्ये 96 रुपये तर 3 ऑक्टोबरपासून प्रति किलोसाठी 98.50 रुपये मोजावे लागत आहे, अशी माहिती सीएनजी पंप डीलर राजेंद्र सलुजा यांनी दिली आहे
काही महिन्यांपूर्वी सत्तरीपार गेलेल्या एलपीजीच्या दरात मात्र घट होत आहे. मागील दोन महिन्यांत 7 रुपयांनी हे दर उतरले आहेत. एक किलो एलपीजी गॅससाठी ऑगस्टमध्ये 70 रुपये, तर सप्टेंबरमध्ये 64.80 रुपये मोजावे लागत होते. ऑक्टोबरमध्ये त्यात पुन्हा कपात होऊन, 63.30 रुपये प्रति किलोपर्यंत हे दर आले आहेत, असे एलपीजी पंपाचे व्यवस्थापक अहेमद पटेल यांनी सांगितले.