औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : बाबा पेट्रोल पंप परिसरात नशेच्या गोळ्या व औषधीची विक्री करणार्याला क्रांती चौक पोलिस व एनडीपीएस पथकाने पकडले. त्याच्याकडून 19 हजार 172 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. शनिवारी मध्यरात्री पावणेबारा
वाजता ही कारवाई करण्यात आली. शेख सोहेल शेख हारून (बागवान) (19, रा. व् हीआयपी हॉलसमोर, गल्ली क्र. 10 इंदिरानगर, न्यू बायजीपुरा) असे आरोपीचे नाव असून, त्याला 21 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
क्रांती चौक ठाण्याचे नाईक भावसिंग चव् हाण (43) यांनी फिर्याद दिली. त् यानुसार, 18 जून रोजी रात्री शेख सोहेल हा बाबा पेट्रोलपंपाजवळ नशेच्या औषधींची अवैधरीत्या विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती एनडीपीएस पथक व क्रांती चौक पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, दोन ठिकाणच्या पोलिसांनी सापळा रचला.
बाबा पेट्रोल पंप उड्डाणपुलाशेजारीलमध्यवर्ती बसस्थानकाकडे जाणार्या रोडवर शेख सोहेलच्या मुसक्याआवळल्या. आरोपीकडून नशेच्या औषधीच्या 25 बाटल्या, 197 गोळ्या, मोबाइल जप्त करण् यात आला. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण् यात गुन्हा दाखल करण्यात आला.