Uncategorized

औरंगाबाद : देशी दारू विक्री; चार जण अटक

अनुराधा कोरवी

औरंगाबाद : अवैध देशी दारू विकणार्‍या चारजणांस शहराच्या वेगवेगळ्या भागांत पोलिसांनी अटक करून त्यांच्या ताब्यातील 10 हजार 740 रुपयांची देशी दारू जप्त केली.

सिडको टीव्ही सेंटर भागात भाजी मार्केटच्या बाजूला देशी दारू विकणार्‍या मेष लक्ष्मण खिरे (46 रा. आंबेडकरनगर ) , सातारा परिसरात अंबादास बालाजी त्रिभुवन (50, रा. छोटा मुरलीधरनगर) व अनिल दादाराव आठवले (35, रा. कबीरनगर, उस्मानपुरा) तसेच सईदा कॉलनीतील वीटभट्टीजवळ अनिता राजू साळुंखे (52, रा. संहिता कॉलनी, वीटभट्टी जवळ) असे चारजण देशी दारू विक्री करत असताना आढळून आले.

या चारजणांना संबंधित ठाण्यांच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 10 हजार 740 रुपयांची देशी दारू जप्त केली.

SCROLL FOR NEXT