Uncategorized

औरंगाबाद : काय तो खड्डा…काय तो महामार्ग…समदं खड्डेमय

दिनेश चोरगे

लासूरस्टेशन, पुढारी वृत्तसेवा : सोलापूर- धुळे मार्गावरील लासुरस्टेशन ते करोडी फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने खड्ड्यांमध्ये तुंबलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना गैरसोय होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे.

औरंगाबाद-नगर मार्गावरील एएस कल्बपासून सुरू झालेल्या सोलापूर-धुळे मार्गाने जवळपास पंधरा ते विस किलोमीटर अंतराचा हायवे मार्ग झाल्याने वाहनधारक प्रवाशांना दिलासा मिळतो. त्यानंतर करोडी फाट्यापासून लासुरकडे जाण्यासाठी नागपूर- मुंबई मार्ग सुरू होतो याच मार्गावर असेगाव- आंबेगाव चौफुलीसह रांजनगाव पोळ व वसुसायगाव आरापुर तसेच सुलतानाबाद देवळी आणि लासुरस्टेशनपर्यंत खूप मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्याची संपूर्ण चाळणी झाल्याने या मार्गावर वाहनचालकांची गैरसोय होत आहे अनेकदा चारचाकी वाहने खड्डे चुकवण्याच्या नादात पाठीमागून किंवा समोरून येणार्‍या वाहने धडकण्याच्या देखील घटना घडल्या आहेत. अशा घटनांतील पाच
ते सहा जखमींना उपचारादरम्यान आपले प्राण गमवावे लागले आहे.

त्यात सद्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचे पाणी साचून डबक्याचे स्वरूप आलेच आहे.
पण या खड्ड्याचा वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने छोटे-मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. महामार्ग असतानाही एक ना अनेक समस्या भेडसावत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

SCROLL FOR NEXT