Uncategorized

औरंगाबाद: 67 कोटींची बनावट बिले; शासनाला गंडा

मोनिका क्षीरसागर

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा: वस्तू व सेवाकर विभागाच्या औरंगाबाद अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईत 67 कोटी रुपयांची खरेदीची बोगस बिले वापरून त्याद्वारे 12 कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट निर्माण करून शासनाची फसवणूक करणार्‍या दोघांना 29 जून रोजी अटक करण्यात आली.फसवणूक व करचोरीच्या विरोधात महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने आक्रमक मोहीम राबवली आहे.

सदर मोहिमेचा भाग म्हणून औरंगाबाद येथील अ‍ॅल्युमिनिअम स्क्रॅपच्या दोन व्यावसायिकांकडे अन्वेषणपर धाडी टाकण्यात आल्या. मे. एस. आर. मेटल आणि मे. डोअर्स वर्ल्ड या दोन फर्मचे मालक अनुक्रमे समीर चौधरी व मनोज व्यास यांना अटक करून प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले. सदर व्यावसायिकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. नाशिक क्षेत्रातील जीएसटी कायद्यांतर्गत अशा प्रकारची ही पहिलीच रवाई आहे. सदर प्रकरणात मालाची कोणतीही वाहतूक न करता बनावट ई-वे ल तयार केल्याची बाबदेखील वस्तू व सेवाकर विभागाच्या लक्षात आली आहे.

या इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळ्याचे अन्वेषण वस्तू व सेवाकर विभागाद्वारे सुरू असून, सदर व्यावसायिकांच्या खरेदी व विक्रीच्या व्यवहारांची सखोल तपासणी अन्वेषण विभाग करत आहे. वस्तू व सेवाकर विभागाचे अपर राज्यकर आयुक्‍त सुभाष एंगडे तसेच राज्यकर सहआयुक्‍त जी. श्रीकांत यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली राज्यकर उपायुक्‍त रवींद्र जोगदंड, सहायक राज्यकर आयुक्‍त नितेश भंडारे, सहायक राज्यकर आयुक्‍त प्रकाश गोपनर तसेच अन्वेषण विभागातील राज्यकर निरीक्षक यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला. करचुकवेगिरी करणार्‍या व्यापार्‍यांच्या विरोधात येणार्‍या काळात अशा मोहिमा मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार असल्याची माहिती देऊन सर्व व्यापार्‍यांनी वस्तू व सेवा कराचा भरणा शासनाच्या तिजोरीत नियमितपणे करावा असे आवाहन औरंगाबाद विभागाचे जी. श्रीकांत यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT