Uncategorized

आहेरवाडीत आढळले दोन मांडूळ जातीचे साप

backup backup

दक्षिण सोलापूर : पुढारी वृत्तसेवा दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथील गुरुराज दिंडुरे यांच्या शेतातील विहिरीत मांडूळ जातीचे दोन साप अढळून आले आहेत. याबाबतची माहिती प्राणिमित्र मल्‍लिकार्जुन धुळखेडे यांना दिली आहे. दोन्ही साप विहिरीतून काढून त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले. मांडूळ सापाबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. हा साप बिनविषारी असून तो शेतकर्‍यांचा मित्र असल्याने त्याला मारू नये, असे आवाहन प्राणिमित्र संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

या सापांबद्दल अनेक गैरसमज असल्याने याची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते. मात्र, खर्‍या अर्थाने याला कुणीच विकत घेत नसतो. केवळ गैरसमजातून अशा निरुपद्रवी सापांना असे लोक विनाकारण पकडून अनेक दिवस कोंडून ठेवतात. त्यामुळे यांची तब्येत खालावते. त्यामुळे अनेक सापांचा मृत्यूू होतो. निसर्गाच्या अन्‍नसाखळीतील हे घटक महत्त्वाचे आहेत. मात्र, मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाच्या अन्‍नसाखळीवर विपरीत परिणाम होऊन अन्‍नसाखळी बिघडते. यावेळी सापांना विहिरीतून बाहेर काढण्यासाठी प्राणिमित्र संस्थेचे प्रवीण कोणदे, नागनाथ बोरगाव यांनी परिश्रम घेतले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT