Uncategorized

आषाढी यात्रेतील स्वयंसेवी संस्थांचा सन्मान

backup backup

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन सुखकर व्हावे यासाठी विविध स्वयंसेवी संस्थानमधील स्वयंसेवकांनी आहोरात्र मंदीर व मंदीर परिसरात सेवा केली असून या स्वयंसेवी संस्थांचा सन्मान मंदीर समितीच्यावतीने श्री संत तुकाराम भवन, पंढरपूर येथे करण्यात आला. या सन्मान सोहळ्यामध्ये गीताई सेवा मंडळ औसा, श्री अविनाश झव्हेरी पंढरपूर, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग गोपाळपूर, दासोह रत्न चक्रवती दानेश्वर महाराज बागलकोट, मे शिवदत्त डेकोरेटर्स पुणे, वजीर रेक्स्यू फोर्स सांगली, मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथक पुणे, भारत सेवाश्रम संघ कलकत्ता, श्री संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ आळंदी, विश्व सामाजीक सेवा संस्था आळंदी, श्री. विठ्ठल सेवा मंडळ पुणे, वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट मुंबई, श्री संत गजानन महाराज मठ अकोला, मे. सुमित फॅसिलिटी लिमिटेड पुणे, मे बीव्हीजी इंडिया लिमिटेड पुणे, श्री.ज्ञानेश्वर महाराज स्वयंसेवा कार्यकारी मंडळ (स्वकाम सेवा) आळंदी आदी संस्थांचा सन्मान मंदिर समितीचे ह.भ.प. ज्ञानेश्वर महारज जळगांवकर, सदस्य श्रीमती शकुंतला नडगिरे, कार्यकारी अधिकारी गजानन गुरव तसेच व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मंदिर समितीचे अधिकारी व विभाग प्रमुख यांचादेखील सन्मान करण्यात आला.

आषाढी वारीच्या निमित्ताने शेकडो मैलाचा पायी प्रवास करून श्रीक्षेत्र पंढरपूर नगरीत दाखल झालेल्या लाखो वारकरी, भक्तमंडळी, भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन सुखकर व्हावे यासाठी विविध स्वयंसेवी संस्थानने व मंदीर समितीच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी बजावलेली सेवा कौतुकास्पद आहे. त्यांच्या सेवा कार्यामुळे आणि सहकार्यामुळे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षानंतर भरलेली यंदाची वारी ही आनंद वारी बनली. त्यांच्या या सेवाकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या वतीने सदरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमामध्ये कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, सदस्य शकुंतला नडगिरे व कार्यक्रमाचे अध्यक्ष ह. भ. प. ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड तसेच पुजारी संदीप कुलकर्णी तसेच यांनी आपले मनोगत व्यक्त करून आषाढी यात्रा कालावधीत काम करणार्‍या कर्मचार्‍यांची व स्वयंसेवकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विनोद पाटील यांनी केले, तर विभाग प्रमुख राजेंद्र सुभेदार यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिर समितीच्या कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

SCROLL FOR NEXT