Uncategorized

जागतिक संग्रहालय दिन विशेष; तेरचे कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय संग्रहालय

Pudhari News

 

उस्मानाबाद तालूक्यातील तेर येथील श्री.संत गोरोबा काका यांच्या नावाने आपुलकीने व आदराने त्यांचे नाव घेतले जाते. याच तेरमध्ये कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय संग्रहालय असून याच संग्रहालयात दोन हजार वर्षापूर्विचा इतिहास जणू वास्तव्याला आहे. हे संग्रहालय देश, परदेशातील पर्यटकांचे अभ्यास केंद्र बनले आहे.

एक युरोपीयन अभ्यासक एका बंगाली हेडमास्तरांच्‍याबरोबर १९३० च्या सुमारास तेर येथे आले होते. त्यांनी तेरमधील मंदिरे पाहून जाताना टेकडीवरील खापराचे तुकडे ते रूमालात बांधून घेऊन जाऊ लागले. हा काय प्रकार आहे हे  रामलिंगप्पा लामतुरे यांनी हेडमास्तरांमार्फत युरोपीयन ग्रहस्थाला विचारला.  तेव्हा हेडमास्तरांनी सांगितले की, या खापरांना इतिहासाच्या अभ्यासात खूप महत्व आहे.  हे ऐकून रामलिंगप्पा लामतुरे यांनी वस्तू गोळा करण्यास सुरूवात केली.  

गावातील खेळणार्‍या मुलांना, गुराख्यांना, शेतकर्‍यांना कधी पैसे तर कधी धान्य असा मोबदला घेऊन त्यांना वस्तू गोळा करण्याचा धंद लागला. वीस-पंचविस वर्षात त्‍यांनी एक स्वतंत्र  संग्रहालय निर्माण होईल इतक्या विविध वस्तू गोळा केल्या.  त्यांनी गोळा केलेल्या वस्तू दोन हजार वर्षापूर्विच्या असल्या तरी मुर्तीच्या चेहर्‍यावरील भाव अगदी स्पष्ट दिसतात. त्यामुळे तत्कालीन मुर्तीकारांनी असे कोणते कसब आत्मसात केले की होते की, ज्यामुळे आजही या मूर्ती जीवंत वाटतात. 

या संग्रहालयात हस्तीदंताच्या वस्तू,शंखाच्या वस्तू, हाडाच्या वस्तू, केओलियन वस्तू, मातीच्या वस्तू, मानवी प्रतिमा, लज्जागौरी, धाकूच्या वस्तू व नाणी, दगडाच्या वस्तू, मोगँलियन भांडी, अर्चनाकूंड आदी विविध वस्तूंचा समावेश आहे. लामतुरे यांनी गोळा केलेल्या वस्तू पहाण्यासाठी भारतीय तसेच परदेशातील विद्वान तेरला भेट देऊ लागले.

हा पुरातन वस्तू संग्रह तेरला संग्रहालय करण्याच्या अटीवर कै.रामलिंगप्पा लामतुरे यानी. १९६१-६२ ला २३८९२ वस्तूचा अनमोल संग्रह पुरातत्व विभागास एकही पैसा न घेता विनामुल्य सूपूर्द केला.  त्यानंतर शासनाने तेर येथे कै.रामलिंगप्पा लामतुरे यांच्याच नावाने संग्रहालय केले. या संग्रहालयात देश व परदेशातील पर्यटक अभ्यास करण्यासाठी येत असतात.

तेर येथील कै.रामलिंगप्पा लामतुरे संग्रहालयात २५००० पुरावशेष, मूर्ती, शिल्प व ईतर वस्तू असून संग्हालयात असणारा अमु्ल्य ठेवा व संग्रहालयाकडे असलेल्या सातवाहन तसेच इतर संक्रतीच्या पाऊलखूना याचे महत्व लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने या संग्रहालयासाठी नवीन वास्तू उभी करण्यासाठी १५ कोटी ६८ लाख रूपये निधीस प्रशासकीय मान्यता देऊन मंजूर केला आहे. संग्रहालय शास्त्राप्रमाणे नवीन इमारत देश-विदेशातील पर्यटक, अभ्यासक, प्रेक्षक, संशोधक, यांच्‍या करीता लवकरच उभी राहील.

SCROLL FOR NEXT