Uncategorized

विरार : महिलेने कर्मचाऱ्यांना मीटररूममध्येच डांबले

Pudhari News

विरार ; पुढारी वृत्तसेवा : वीज मीटर कापल्याच्या रागातून महिलेने महावितरण कर्मचाऱ्यांवर दादागिरी केली. त्यांना मीटररूममध्येच लॉक करून डांबून ठेवल्याचा प्रकार विरारमध्ये घडला आहे.

विरार पूर्वेच्या पाचपायरी परिसरातील गोविंद एकता सोसायटीत महावितरणाचे कर्मचारी बिल न भरलेल्या मीटरवर कारवाई करण्यासाठी गेले हाेते. त्यांचा एका महिलेशी वाद झाला. महिलेने आपले थकीत वीजबील भरले असतानाही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तिची वीजमीटर कापण्यास सुरुवात केली. यानंतर महिलेचा संताप अनावर झाला. तिने चक्क मीटररूममध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना आत डांबून ठेवून बाहेररून टाळे ठोकले.

हे कर्मचारी लॉक खोलण्यासाठी बऱ्याच विनवण्या करीत होते. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यानंतर सोसायटीच्या इतर रहिवाशांनी महिलेची समजूत घालून २०-२५ मनिटांनी कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. महिला व कर्मचाऱ्यांची समजूत घातल्यानंतर हे प्रकरण शांत झाले. याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT