हतनूर : प्रतिनिधी
कन्नड तालुक्यातील हतनूर येथे शिवसेनेतर्फ ओला दुष्काळ निवारण केंद्र दि.१६ रोजी सुरु करण्यात आले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसठी शिवसेना मदत केंद्र सुरु करण्याबाबत सूचना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केल्या त्या अनुशंघाने हतनूर येथे ओला दुष्काळ निवारण मदत केंद्र सुरु करण्यात आले. यावेळी या मदत केंद्रात किती शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला, किती जणांना तो मिळाला, किती नुकसान भरपाई मिळाली, विमा कंपन्या कोणाला दाद देत नाहीत का याची माहिती शिवसेने मार्फत मदत केंद्रात जमा करण्यात येणार आहे .
यावेळी या केंद्राचे उद्घाटन शिवसेना उप तालुका प्रमुख दिलीप मुठ्ठे, शिवाजी थेटे यांच्या हस्ते करण्यात आले. या उदघाटनप्रसंगी शिवसेना विभाग प्रमुख शरद शिरसाट, उपविभाग प्रमुख फूलचंद कुंठे, माजी सरपंच लक्ष्मण केरे, अर्जुन वाडकर, अशोक केवट, उप सरपंच रघुनाथ गायकवाड, अंबादास जगताप, उमेश कुंठे, बाळासाहेब पवार, पांडुरंग शिंदे, कैलास केरे, रविंद्र केवट, आदींची उपस्थिती होती .