Uncategorized

लगीनसराईमुळे छोटे व्यावसायिक आनंदले

backup backup

तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा

सध्या मावळ परिसरात लग्नसराई सुरु झाली आहे. त्यामुळे यावर अवलंबून असणारे छोटे व्यावसायिक आनंदले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक समारंभावर मर्यादा आलेली होती; परंतु आता कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आणि नियम शिथिल झाल्यामुळे वातावरण बर्‍यापैकी सुरळीत झाले आहे.

कोरोनाचे नियम शिथिल झाल्यामुळे लग्न समारंभ उत्साहात साजरे होत आहेत. लग्नविधी करणारे पुरोहित, कार्यालय व्यावसायिक, फुलांचा व्यवसाय करणारे, फोटो काढणारे; तसेच व्हिडिओ शुटींग काढणारे व्यावसायिक, आचारी, रोषणाई करणारे, रोजंदारी कामगार, वाजंत्री, मंडपवाले, मेंदी काढणारे, नवर देवांसाठी घोडे आणनारे व्यावसायिक फटाके व्यावसायिक आदी व्यवसायिकांना काम मिळत आहे. त्यामुळे ते आनंदात आहेत.

तसेच सोने-चांदीच्या, कापड व्यावसायिकांचे दुकानात खरेदीसाठी गर्दी दिसत आहे.भाजी बाजारही तेजीत आहेत. सुमारे 2वर्ष हलाखीत दिवस काढल्यामुळे आता व्यवसायिक समाधानात आहेत.

नगरपरिषद,जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज संस्थांत लवकरच निवडणुका लागणेची शक्यता असल्यामुळे कार्यकर्ते, नेतेमंडळी लग्नसोहळ्यास आवर्जून हजेरी लावत आहेत. यजमानांचे आग्रहाखातर भाषणही करीत आहेत. परिसरात मंगलाष्टके, पारंपरिक वाद्य, फटाक्यांचे आवाज ऐकावयास येत आहेत. त्यमुळे सुमारे दोन वर्षानंतर खरोखरीच लगीनघाई सुरू झाली आहे. सनई-चौघडा ऐवजी 'डीजे'

पुर्वीच्या लग्न सोहळ्यात जेवणाची पंगत बसल्यावर श्लोक म्हटले जात; परंतु आता श्लोक कानावर पडणे विरळा झाले आहे. तसेच पुर्वी लग्नात सनई -चौघडा वादन व्हायचे; मात्र आता त्याची जागा 'डीजे'ने घेतली आहे.

https://youtu.be/Hyp_H0RMsO0

SCROLL FOR NEXT