Uncategorized

तीन वर्षाच्या चिमुकलीचा कोरोनाने मृत्यू

Pudhari News

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. मागच्या काही दिवसांपुर्वी अवघ्या २९ दिवस आणि ६ महिन्याच्या बाळांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान गुरुवारी (दि.१) आणखी एका चिमुकलीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तीन वर्षाच्या या मुलीवर सिल्लोडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, तिला बुधवारी (दि.३१) घाटीत दाखल करण्यात आले होते, गुरुवारी पहाटे पाच वाजता तिचा मृत्यू झाला.

अधिक वाचा : चंद्रपूर : विद्यार्थीनीने मागणीला नकार देताच शिक्षकाचा मुलींच्या वसतिगृहात धिंगाणा

सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील ३ वर्षांच्या या चिमुकलीला ॲनिमियाचा आजार होता. तिला न्युमोनियाही झाला होता. मागील दहा दिवसांपासून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. काल तिला घाटीत दाखल करण्यात आले असता, तिची कोरोना टेस्ट करण्यात आली. यात ती पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. त्यानंतर तिच्या आईचीसुद्धा तपासणी केली असता, आईदेखील पॉझिटीव्ह आल्याचे घाटीच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. प्रभा खैरे यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT