Uncategorized

सोलापूर : मुलाने मारहाण करत घेतला वडिलांच्या कानाचा चावा; वडील गंभीर जखमी

मोनिका क्षीरसागर

सोलापूर: पुढारी वृत्तसेवा; किरकोळ कारणावरून मुलाने वडिलांना शिवीगाळ करत, दाताने वडिलांच्या डाव्या कानाचा चावा घेत कानाचा तुकडा काढला. मुलाने आणि जावयाने रागाच्या भरात वडिलांना हात आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मुलाने बांबूच्या काठीने वडील आणि बहिणीला मारहाण करून तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. यामध्ये वडील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची कवठेमहाकाळ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

याबाबत रावसो विठोबा नलवडे (रा. शिरभावी ता. सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मुलगा युवराज रावसो नलवडे (रा. शिरभावी ता. सांगोला) व जावई निलेश ईश्वर शिंदे रा. वाघोली ता. कवठेमहंकाळ यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आरोपी मुलगा रावसो विठोबा नलवडे यांचा मोठा मुलगा युवराज हा विभक्त राहतो. मुलाबरोबर किरकोळ कारणासाठी सतत भांडण होत आहे. रावसो यांची मुलगी माधुरी हीचे लग्न वाघोली येथील निलेश ईश्वर शिंदे यांच्याबरोबर झाले आहे. निलेश हा पत्नी माधुरीबरोबर सतत कोणत्यातरी कारणावरून सतत भांडण करीत होता. गुरूवारी (दि.२१) रात्री ९.३० च्या सुमारास मुलगा युवराज व जावई निलेश हे दोघे मिळून रावसो नलवडे यांच्या घरी आले.

जावई निलेश याने तुम्ही माझ्याविरुद्ध कवठेमहाकांळ पोलीस ठाणे येथे तक्रार का केली आहे, असे म्हणून सासरे व पत्नीला शिवीगाळ करू लागले. यावर रावसो नलवडे हे काय झाले शांत बसा, असे म्हणाले असता, मुलगा युवराज याने तुम्ही पाहुण्यांची तक्रार का केली असे म्हणत या दोघांनी मिळून वडिलांना हात आणि लाथाबुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली. मुलाने अंगावर बसून वडिलांच्या कानाचा दाताने जोरात चावा घेत, कानाचा तुकडा काढत गंभीर जखमी केले. तसेच बाजूला पडलेल्या बांबुच्या काठीने वडील आणि बहिणीला मारहाण करत तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT