Uncategorized

ऑनलाईन दारू मागवणाऱ्या अभिनेत्रीची फसवणूक

Pudhari News

मुबंई; पुढारी ऑनलाईन : सध्या कोरोनामुळे ऑनलाईन शॉपिंगला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, अनेक वेबसाइट आणि प्लॅटफॉर्मवरून फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी यांनी मद्यासाठी ऑनलाइन पेमेंट केले. त्यात त्यांची फसवणूक झाली आहे. आझमी यांनी ट्विट करून त्याबाबत माहिती दिली आहे.

वाचा : मायक्रोसॉफ्टच्या विंडोज ११ ची घोषणा, नवे डिझाईन आणि नवा स्टार्ट मेन्यू 

शबाना आझमी यांनी ट्वीट करत म्हणाल्या, 'सावधान..माझी फसवणूक झाली आहे. #Living Liquidz यांना मी ऑर्डर दिली होती. पेमेंटही आधीच केलं होतं. मात्र अद्याप माझ्या ऑर्डरची डिलिव्हरी झालेली नाही. शिवाय ते माझा फोनही उचलत नाहीत. 'असं म्हणत शबाना आझमी यांनी ज्या नंबरवर पेमेंट केलं तो नंबर आणि अकाऊंट नंबरच्या डिटेल्सही दिल्या आहेत. आझमी यांचे हे ट्विट व्हायरल झाले आहे. त्यानंतर शबाना आझमी यांनी आणखी एक टि्‌वट करत फसवणूक करणाऱ्यांचा पर्दाफाश झाला असे सांगितले आहे. लोकांना फसवणाऱ्या या टोळीवर मुंबई पोलिस आणि सायबर सेलने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केलीय. 'लिविंग लिक्विड्सच्या मालकांना ट्रेस करण्यात आले आहे. ज्या लोकांनी माझी फसवणूक केली आहे. ते बोगस असून त्यांचा लिविंग लिक्विड्सशी काहीच संबध नाही' असे त्यांनी ट्विट केले आहे. 

वाचा : कोल्हापूरसह 7 जिल्ह्यांत घाईने अनलॉक नको

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT