सावंतवाडी : शहर वार्ताहर
जिल्हाधिकार्यांनी आदेश देऊनही जातपंचायती बाबतच्या तक्रारीची दखल न घेणार्या सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या कारभाराविरोधात 26 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा मळेवाड म्हापसेकरवाडी येथील प्रकाश अनंत मुळीक यांनी दिला आहे.
याबाबत त्यांनी जिल्हाधिकार्यांना दि ल ेल्या निवेदनात नमूद केले आहे, मळेवाड येथे कुलदेवता मंदिरात जातपंचायत भरवून आपल्या 14 कुटुंबाना बहिष्कृत करून वाळीत टाकल्याची तक्रार देण्याचा प्रयत्न आपण गेली दोन वर्षे करत आहोत. मात्र त्यावर सावंतवाडी पोलिस ठाण्याकडून योग्य ती कारवाई करण्यात आली नाही. याबाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन दिल्यावर त्यांनी सामाजिक बहिष्कार घालण्याबाबत महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक अधिनियम 2016 नुसार कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.
मात्र, जिल्हाधिकार्यांच्या आदेशानंतरही पोलिसांनी कारवाई केलेली नाही. त्यामुळे बहिष्कार घालणार्या विरोधात महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक अधिनियम 2016 नुसार कारवाई करण्यात यावी, यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 26 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे मुळीक यांनी सदरच्या निवेदनात म्हटले आहे.