सिंधुदुर्ग; पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्हातील कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गालगत असणारे निसर्गरम्य वर्षा पर्यटन स्थळ म्हणजे सावडाव धबधबा. गेली काही दिवस मान्सून पाऊसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे सावढाव धबधब्याच्या उंच कड्यांवरून पांढरे शुभ्र फेसाळणारे फवारे लक्ष वेधून घेत आहेत.
मात्र कोरानाचे संकट जगभर पसरल्यानतंर गतवर्षीप्रमाणे यंदाही सावढाव धबधबा वर्षा पर्यटनासांठी बंद आहे. यामुळे पर्यटक हिरमुसले असून सध्या धबधबा परिसरात धबधब्यांच्या पाण्याचा आवजाव्यतिरिक्त इतर कोणताही आवाज ऐकू येत नाही. दरवर्षी पर्यंटकांचा होणरा किलबिलाट आता ऐकू येत नाही. दरवर्षी गर्दी करणारे वर्षा पर्यटक दिसत नसल्याने कमालीची शांतता पसरली आहे. पर्यटक नसल्याने येथील व्यावसायिकांचा रोजगार बंद झाला आहे. याचबरोबर ग्रामपंचायतीला मिळणा-या उत्पन्नातही घट झाली आहे.
पण, लोकांची वर्दळ नसल्याने कोरोमुळे धबधबा परिसर स्वच्छ व प्रदुषण मुक्त झाला आहे. सलग दुसऱ्या वर्षी निसर्गाने मोकळा श्वास घेतला आहे.
सावधाव धबधबा पश्चिम महाराष्ट्र, गोवा, कनार्टकसह महाष्ट्रातील अनेक पर्यटकांना भूरळ घालतो. दरवर्षी हजारो पर्यटक या पर्यटन स्थळाला भेट देत असतात. सावडाव धबधबा पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाल्यावर अनेक सुविधा सावडाव धबधबा परिसरात झालेल्या आहेत. पर्यटक अनेकवेळा बेधुंद होत या वर्षा पर्यटनाचा आनंद घेताना दिसायचे.
सध्या धबधबा परिसरात जाणारा रस्ता संपूर्ण सुसज्ज झाला असून पूरेशा सुविधा उपलब्ध आहेत. मात्र दोन वर्षे पर्यटक नसल्याने तो सुना सुना आहे. पर्यटकांशिवाय पर्यटन स्थळाला शोभा नाही.