सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसावर सोमवारी सकाळी एकाने अचानक हल्ला केला. अजयराज देशमुख असे त्या पोलिसाचे नाव आहे. पोलिसावर हल्ला झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनास्थळी असणाऱ्या इतर पोलिसांनी धाव घेऊन मारहाण करणाऱ्याला ताब्यात घेतले. या हल्ल्यात पोलिसाच्या तोंडाला मार लागला असून रक्तही आले आहे. घटनेची नेमके कारण समजले नसून जखमी झालेल्या पोलिसाला उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.