मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यासंबंधी आज (दि. १२) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली. ब्रिटिश कालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा अधिकार राज्याला आहे, असेही शेवाळे यांनी यावेळी नमूद केले. यानंतर आता मुंबई सेंट्रलचे नाव नाना जगन्नाथ शंकरशेठ हे ठेवण्यात यावं असा प्रस्ताव देखील केंद्राला देण्यात आला आहे असेही शेवाळे यांनी सांगितलं.
करीरोडचं नाव लालबाग तसेच सॅण्सरोडचं डोंगरी, मरीनलाईन्सचं मुंबादेवी, डॉकयार्डचं माझगाव स्टेशन, चर्नीरोडचं नाव गिरगाव, कॉर्टनगरीनचं काळाचौकी आणि किंग्ज सर्कलचं नाव बदलून ते तिर्थकर पार्श्वनाथ करण्यासंदर्भात चर्चा झाली.