Uncategorized

राष्ट्रीय परवाना शुल्क आता भरा ऑनलाईन

Pudhari News

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

देशातील मालवाहतूक करणार्‍या लाखो ट्रकमालकांना केंद्राच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोठा दिलासा दिला आहे. ट्रकमालकांना आता राष्ट्रीय परवाना शुल्क अर्थात नॅशनल परमिट फी ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. त्यामुळे कोरोना व लॉकडाऊनच्या काळात ट्रक व्यवसायिकांना आरटीओमध्ये खेटे घालावे लागणार नाहीत.

ट्रकचालकांच्या ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने केंद्राच्या निर्णयामुळे ट्रक व्यवसायिकांची मोठी डोकेदुखी टळणार असल्याचे सांगितले. संघटनेचे कार्यकारी सदस्य बाबा शिंदे म्हणाले की, कोरोना काळात आरटीओमध्ये जाण्यासाठी अनेक ट्रक चालक व मालकांना अडचणी येत होत्या. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे स्वतः चालकच मालक असलेल्या व्यवसायिकांना एक दिवसाचा व्यवसाय बंद ठेवून परवाना शुल्क भरण्यासाठी आरटीओचे खेटे घालावे लागत होते. याबाबत संघटनेने केंद्र शासनाकडे ऑनलाईन शुल्क भरण्याची मागणी केली होती. त्यावर केंद्र शासनाने शिक्‍कामोर्तब केल्यामुळे व्यवसायिकांचा वेळ व पैसे अशी दुहेरी बचत होणार आहे.

SCROLL FOR NEXT