Uncategorized

पुणे : ‘एनडीए’च्या माजी कॅडेट्सचे उद्यापासून पासिंग आऊट परेड

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नोव्हेंबर 1971 मध्ये कमिशन मिळवलेले आयएमए ( भारतीय रक्षा अकादमी) ऑफिसर आणि त्यांच्या पत्नी तसेच हुतात्मा अधिकार्‍यांच्या जिगरबाज महिला, जे 39 व्या राष्ट्रीय सुरक्षा अकादमीमधून कॅडेट म्हणून उत्तीर्ण झाले असे सर्व 15- 16 डिसेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पासिंग आऊट परेडसाठी एकत्र येणार आहेत. ही परेड कोवीड कारणामुळे पुढे ढकलण्यात आली होती, ती यंदा होत आहे.

देशासाठी बलिदान देणार्‍या शहिदांची आठवण म्हणून यावेळेस भेटणारे सर्व माजी सैनिकी अधिकारी त्यांच्या कुटुंबीयांसमवेत राष्ट्रीय सुरक्षा अकादमीतील हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांच्या स्मारकाला मानवंदना देतील. वैशिष्ट्य म्हणजे यावेळेस या 18 शूरवीर हुतात्मा सैनिकी अधिकार्‍यांच्या पत्नी वेगवेगळ्या ठिकाणावरून या मेळाव्यासाठी खास हजर राहणार आहेत.  काही अधिकार्‍यांनी संयुक्त राष्ट्र महासंघाच्या शांती सैन्यामध्ये तसेच सैन्यातील सल्लागार मंडळात सहभाग घेतला आहे. तसेच एअर चीफ मार्शल एन ए के
ब्राउनी,नॉर्वे येथील राजदूत म्हणून, लेफ्टनंट जनरल व्ही के अल्वालिया हे सैन्य दलातील विधिमंडळामध्ये कार्यरत होते. काहीजणांनी वरील विषयांवर पुस्तके पण लिहिली आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT