औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : करमाड येथून औरंगाबादच्या मध्यवर्ती बस स्थानकाकडे निघालेली स्मार्ट सिटी बस रविवारी अचानक पेटली. ही बाब चालकाच्या वेळीच लक्षात आल्याने त्याने बस थांबून सर्व प्रवाशांना खाली उतरविले. त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र या घटनेत संपूर्ण बस जळून खाक झाली. ही घटना वरुड फाटा येथे दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी घडली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.