इस्लामपूर : वार्ताहर
इस्लामपूर मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केलेली बंडखोरी कायम राहीली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना ही बंडखोरी थोपविण्यात यश आले नाही. त्यामुळे येथील निवडणूक तीरंगी- चौरंगी होणार आहे. आता विधानसभेच्या मैदानात ७ उमेदवार राहिले आहेत.
आज दिवसभर मतदारसंघात निशिकांत पाटील यांनी केलेले बंड विकासआघाडी थोपविणार का याचीच चर्चा मतदारसंघात होती. त्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील , जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यामार्फत प्रयत्न सुरु होते. विकास आघाडीचे नेते या घडामोडीवर लक्ष ठेवून होते. मात्र निशिकांत पाटील यांनी दिवसभर आपला फोन बंदच ठेवला होता. त्यामुळे त्यांचा कोणाशीही संपर्क झाला नाही. पाटील मैदानात राहिल्याने राष्ट्रवदीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह शिवसेनेचे गौरव नायकवडी, अपक्ष निशिकांत पाटील, बहुजन वंचीतचे शाकीर तांबोळी बळीराजा शेतकरी संघटनेचे बी. जी. पाटील यांच्यात तीरंगी- चौरंगी लढत होणार आहे.