नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्रभू श्रीराम यांच्या काळातील सुवर्णमृगाची आख्यायिका सर्वांना माहित आहेच. नाशिकमध्ये देखील अशाचप्रकारे ममदापूर येथील संवर्धन राखीव वनात हरीण मुक्तपणे बागडत असून त्यांच्यावर उन्हाळ्यातील किरणे पडल्याने जणू सुवर्णमृगाचा भास होत आहे. अशा या हरणांचा मुक्तविहार सुरु आहे. ममदापूर येथील संवर्धन राखीव वनात बागडणारे हे हरणांचे कळप रखरखत्या उन्हातही पाहणार्यांच्या डोळ्यांना एक सुखद अनुभव देतात. असेच काही क्षण टिपले आहेत आमचे छायाचित्रकार हेमंत घोरपडे यांनी.
पहा काही निवडक फोटो….