जळगाव : पुढारी ऑनलाईन
वरणगाव शहरातील आंबेडकर नगर येथील रहिवासी असणा-या एका युवकाचा खून झाल्याचे समोर आले आहे. सोमवार (दि ७) च्या रात्री ही घटना घडली. अधिक तपास पोलिस करत आहेत.
अधिक माहिती अशी की, वरणगाव शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ परीसरात सोमवारी रात्री सचिन मगरे युवकाचा खून झाला. या खून प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केल्याचे समजते आहे. पोलिसांच्या माहितीनुसार मागील सहा महिन्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीच्या नातीचा वाढदिवस होता. त्या ठिकाणी धक्का लागल्याच्या कारणावरून मृत सचिन मगरे व संशयीत आरोपींमध्ये वाद झाला होता. काही दिवसांनी जूना वाद सोमवारी रात्री पुन्हा उफाळून आला. त्यातूनच सचिन मगरे याचा खून झाल्याची शक्यता आहे.