Uncategorized

मुंबई : राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाकडून एक कोटी रूपयांचा मुद्देमाल जप्त 

Pudhari News

मुंबई :  पुढारी वृत्तसेवा

राज्य उत्पादन शुल्क विभागाने रायगड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात घातलेल्या धाडीत सुमारे १ कोटी ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये विदेशी बनावटी मद्याचा समावेश आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप व संचालक उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

अधिक वाचा : 'ब्रेक द चेन' अंतर्गत शिवभोजन थाळी आता १४ जून पर्यंत मोफत

गोव्याहून निघालेल्या एका ट्रकमध्ये बनावट मद्य असल्याची माहिती मिळाली असता, उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हा ट्रक पनवेल येथील जय मल्हार गार्डन रेस्टॉरंट येथे अडविला. या ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये विदेशी मद्याचे रॉयल चॅलेंज, ऑफिसर चॉईस तसेच ओल्डमंक रमचे एकूण, ५०० बॉक्स आढळले. ट्रकसह ५६ लाख ५० हजार  रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  या प्रकरणी ट्रक चालक शिंकु मिश्रा आणि क्लिनर शैलेश पद्मावती यांना अटक करण्यात आली. कांशीराम आंगणे व इतर आरोपींची संशयित म्हणून नोंद करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संताजी लाड हे करत आहेत.

अधिक वाचा : फुल चार्जिंगनंतर 'ही' इलेक्ट्रीक कार धावते ३७५ किलोमीटर!

दुसऱ्या एका घटनेत वाशी तालुक्यातील बीड- उस्मानाबाद मार्गावर हॉटेल शिवनेरी येथे राज्य उत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक मालवाहतूक ट्रक अडविला असता, त्यामध्येही विदेशी मद्याचे बॉक्स आढळून आले. सुमारे ४३ लाख ९३ हजार ३०६ रूपयांच मद्यसाठा आढळला आहे. सदर प्रकरणी ट्रक चालक महेश अजणारे आणि ट्रक क्लीनर काना चारल यांना अटक करण्यात आली आहे.

अधिक वाचा : अरुण गवळीने कमलाकर जमसंडेकरांची अशी घडवून आणली हत्या…

मद्य पुरवठादार दीपक राजपूत व भाईजान मौलाना यांची संशयित आरोपी म्हणून नोंद करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक मनोज चव्हाण करत आहेत. दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये १ कोटी ४३ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT