Uncategorized

मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडरला मिळाली पहिली बोली 

Pudhari News

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मुंबई महानगरपालिकेच्या कोरोना लस ग्लोबल टेंडरला पहिली बोली मिळाली आहे. स्पुटनिक व्हीचे १ कोटी डोस आयात करण्यासाठी पहिला प्रस्ताव मिळाला आहे. हे डोस महापालिकेला ७०० कोटी रुपयांना मिळण्याची शक्यता आहे. महापालिकेला अजून बोली मिळेल असा विश्वास आहे. मुंबई महापालिकेने त्यांच्या प्रत्येक नागरिकाला लस मिळावी यासाठी ग्लोबल टेंडर काढले होते. भारतात कोरोना लसीसाठी ग्लोबल टेंडर कढणारी मुंबई महानगरपालिका ही पहिला महापालिका ठरली. 

कोरोनामुक्त झाल्यानंतर लस कधी घ्यावी? नवीन नियम जारी!

भारताची आर्थिक राजधानी मुंबईचे लसीकरण करण्यासाठी जवळपास ७०० कोटी रुपये लागतील असे मत महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी व्यक्त केले. वेगवान लसीकरण झाले तर कोरोनाची तिसरी लाट थोपवता येईल. त्यामुळे मुंबई महापालिकेचे जवळपास ८०० कोटी जे तात्कालिक रुग्णालयावर कोरोना महामारी रोखण्यासाठी खर्च होत आहेत वाचवता येतील. 

भारतात कोरोनाच्या दोन्ही लाटेत सर्वाधिक संसर्ग हा मुंबईत झाला होता. मुंबई हे लोकसंख्येच्या घनतेबाबत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. संसर्ग जास्त होऊनही मुंबईने कोरोना लवकर आटोक्यात आण्यात सर्वांकडून शाबासकी मिळवली आहे. महापालिका आयुक्त चहल यांनी 'ज्यावेळी आम्हाला १.५ कोटी लसीचे डोस मिळतील तेव्हा आम्ही ६० दिवसात संपूर्ण शहराचे लसीकरण करण्याची योजना आखणार आहोत. आम्ही हे करु शकलो तर आम्ही तिसरी लाट येण्यापासून रोखू शकतो असा आम्हाला विश्वास आहे.' अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

पश्चिम डोंबिवलीत सुसाट गँगने काढले डोके वर!

चहल यांनी सांगितले की आमच्या ग्लोबल टेंडरला आतापर्यंत तीन कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला आहे. यात लंडनमधील तालेसिन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचाही समावेश आहे. तर इतर दोन कंपन्या या हैदराबादमधील आहेत. त्यांनी रशियाची स्पुटनिक व्ही लसचे मार्केट दर रशियन डायरेक्ट इनव्हेसमेंट फंड यांच्याकडून लस वितरीत करण्याचा अधिकृत परवाना मिळाल्याचा दावा केला आहे.  चहल यांनी ही माहिती एका वृत्तसंस्थेला फोनवरुन दिली आहे. 

मुंबईला १८ ते ४५ वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्यासाठी १ कोटी डोसची गरज आहे. तर ५० लाख डोस वयस्कर लोकांच्या लसीकरणासाठी लागणार आहेत. लस आयात करण्यासाठीच्या ग्लोबल डेंडरची अंतिम तारीख १८ मे होती. आता ती वाढवून २५ मे पर्यंत केली आहे. या टेंडरसाठी जगातील सर्व मोठ्या लस उत्पादकांना आमंत्रण दिले आहे. त्यात फायझर, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन, सिरम, भारत बायोटेक या सर्वांचा समावेश आहे. 

SCROLL FOR NEXT