Uncategorized

मराठा आरक्षण : खासदार धैर्यशील मानेंची सलाईन लावून मूक आंदोलनाला हजेरी

Pudhari News

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरमधून मूक आंदोलनाला सुरूवात झाली आहे. भर पावसात आज हे आंदोलन झालं. या आंदोलनात सर्वपक्षीय लोकप्रतिनीधी सहभागी झाले. दरम्यान, तब्येत ठीक नसताना हाताला सलाईन लावली होती, अशा परिस्थितीत शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने आंदोलनात सहभागी झाले. सध्या त्यांचा या अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

धैर्यशील मानेंना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. उपचाराअंती त्यांनी कोरोनावर मात केली आहे. पण, त्यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. आंदोलनात सहभागी होण्यासाठी धैर्यशील माने आपल्या गाडीत सलाईन लावून आंदोलन स्थळी पोहोचले. 

मराठा समाजासाठी कोणत्याही परिस्थितीत असलो तरी उपस्थित राहणार अशी प्रतिक्रिया व्यक्त करत धैर्यशील माने यांनी आंदोलनात उपस्थिती दर्शवली. धैर्यशील माने यांची नुकतीच कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. 

महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी कोल्हापूरने एक पाऊल पुढे घेतले. सर्व प्रतिनिधींना एकत्र केलं. संभाजीराजेंनी सर्वांना हाक दिली, प्रकाशजी आंबेडकर सुद्धा कोल्हापूमध्ये आले, हे पाऊल निश्चित पणे यशस्वी होतील. संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकरांनी रणशिंग फुंकलं आहे. हे नक्कीच यशस्वी होईल.

आरक्षण कोणामुळे थांबलं, आरक्षणाला कोणीच विरोध करत नसताना हा पेच सुटत का नाही हा समाजाला प्रश्न. महाराष्ट्रातील सर्व ४८ खासदारांनी आणि सर्व आमदारांनी एकत्र यावे आणि केंद्राला विशेष अधिवेशन घेण्यासाठी भाग पाडावे. मराठा आरक्षणासाठी मी लोकसभेत आवाज उठवेन, पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही भेटेन, अशी भूमिका यावेळी धैर्यशील माने यांनी मांडली. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT