Uncategorized

तुमच्या मृत्यूचा दाखला तयार आहे; जिवंत शिक्षकाला आला फोन आणि घरी रडारड…

Pudhari News

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाणे महापालिकेच्या कारभाराबाबत ऐकावे तेवढे थोडेच आहे. बेकायदेशीर अभिनेत्रीला लस दिल्याचा प्रकार असो. किंवा एकाच महिलेला १५ मिनिटांत कोरोना लस देताना तीन वेळा सुई टोचल्याचा प्रकार असो. त्या पाठोपाठ आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला. ठाणेकर असलेले चंद्रशेखर देसाई नामक शिक्षकाला चक्क त्यांच्याच मृत्यूचा दाखला तयार असल्याचा एक फोण ठाणे महापालिकेतून आला आहे. या फोनमुळे देसाई कुटुंबाला नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे.

अधिक वाचा : भारतीय संघ श्रीलंकेत दाखल, बीसीसीआयनं केले फोटो शेअर

घोडबंदर रोडवरील मानपाडा येथे राहणारे चंद्रशेखर देसाई (५५) हे गेल्या २० वर्षांपासून ठाण्यात वास्तव्यास असून ते मुंबईतील घाटकोपर येथील शाळेत शिक्षक आहेत. ८० वर्षीय आई, पत्नी आणि तीन मुलांसह ते ठाण्यात राहतात. दरम्यान मागच्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह झाले. मात्र लक्षणे गंभीर नसल्याने आणि त्यांच्या मित्राची खोली रिकामी असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते होम क्वारंटाईन झाले. 

अधिक वाचा : कौर्याची परिसीमा! पतीने पत्नीची हत्या करुन मृतदेहाचे केले तुकडे, सूटकेसमध्ये घातले आणि… 

दरम्यान ते शाळेत काम करत असताना अचानक दुपारी साडेबाराच्या सुमारास एक फोन आला. फोन उचलताच समोरून त्यांना एका महिलेने आपण ठाणे महापालिकेतून बोलत असल्याचे सांगितले. मृत्यूचा दाखला तयार असल्याचे सांगण्यात आले. मॅडम मी जिवंत आहे. मीच आपल्याशी बोलत आहे, असे देसाई म्हणाले. पण फोन ठेवण्यात आला. देसाई हे काम संपल्यावर थेट ठाणे महापालिकेत गेले. 

अधिक वाचा : SBI मध्ये ५ हजार क्लार्क पदांची भरती, परिक्षेसाठी प्रवेशपत्र 'या' लिंकवर उपलब्ध

त्यांनी आलेल्या फोनबाबत संबंधित विभागाच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांना माहिती दिली. तसेच आपण जिवंत असल्याचे सांगितले. तेव्हा त्या वरिष्ठ अधिकारी महिलेने आम्हा आयसीएमआरमार्फत आलेल्या यादीत ज्याप्रमाणे म्हटले आहे. त्याप्रमाणे आपणास फोन करण्यात आला आहे. तसेच त्या अधिकारी महिलेने देसाई यांना त्यांच्या मृत्यूच्या दाखल्याची प्रिंटरही काढून दाखवली.

मृत्यूची तारीख २२ एप्रिल २०२१ 

देसाई यांना दाखवलेल्या प्रिंटरवर त्यांचा मृत्यू २२ एप्रिल २०२१ रोजी म्हणजे ते पॉझिटिव्ह झाल्यानंतर १० महिन्यांनी झाल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांचा मृत्यू हा होम क्वारंटाईन असताना उपचार घेताना मृत्यू झाल्याची स्पष्ट नोंद असल्याचे देसाई यांच्या निर्दशनास आले आहे. तसेच अधिकारी महिलेने यामध्ये आमची काही चूक नाही ज्याप्रमाणे यादी आली आहे. त्याप्रमाणे आपल्या मृत्यूचा दाखला तयार करण्यात आल्याचे म्हटले आहे.

घरी रडारड…

देसाई हे घरी आल्यावर त्यांनी आलेल्या फोनबद्दल घरच्यांना सांगितले. त्यावेळी त्यांच्या बोलण्याकडे सर्वांचे कान टवकारले आणि त्यांच्या ८० वर्षीय आईपासून सर्वजण रडू लागले. कसेबसे समजूत काढून त्यांना शांत केल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

मी सरकारी सेवेत आहे. माझ्याबाबत असा प्रकार घडत असेल तर इतरांच्या बाबत विचारच न केलेला बरा. ज्यावेळी फोन आला त्यावेळी नशीब फोन माझ्याजवळ होता. समजा फोन घरी राहिला असता, आणि तो फोन आई किंवा पत्नी तथा मुलांनी घेतला असता तर काय अनर्थ घडला असता. याचा विचारच करवत नाही. असे प्रकार इतरांच्या बाबतीत घडू नये म्हणून धाडस करून समोर आलो आहे."


– चंद्रशेखर देसाई, शिक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT