Uncategorized

‘कोरोनावर मात केल्यानंतर घ्यायची काळजी’वर आज संवाद

Pudhari News

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

प्रबळ इच्छाशक्‍ती व उत्तम प्रतिकारक्षमतेच्या जोरावर कोरोनावर यशस्वीपणे मात केल्यानंतरही अनेक व्याधी उद्भवत आहेत. प्रामुख्याने फुफ्फुसाचे विकार, हृदयरोग यांचे प्रमाण वाढत आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना गंभीर आजार उद्भवू नयेत यासाठी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.

या पार्श्‍वभूमीवर दैनिक 'पुढारी' आणि अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटल यांच्या वतीने 'कोरोनावर मात केल्यानंतर घ्यावयाची काळजी' या विषयावरील संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. फुफ्फुस रोग तज्ज्ञ डॉ. अजय केणी याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.  गुरुवार दि. (8) रोजी दुपारी 12 वाजल्यापासून दैनिक 'पुढारी'च्या अधिकृत फेसबुक पेजवरून तसेच यू-ट्यूब चॅनेलवर या संवादाचे थेट प्रसारण होणार आहे. 

कोरोनातून बरे झाल्यानंतर उपचाराची गरज असते का, कोणत्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात, खोकल्याचा, थकवा, अशक्‍तपणा, स्नायू दुखी असा त्रास बरेच दिवस राहण्याची कारणे त्यावरील उपाय, कोरोनानंतर हृदय, किडनी, फुप्फुस या महत्त्वाच्या अवयवांशी संबंधित व्याधी आदींवर डॉ. केणी मार्गदर्शन करणार आहेत.

या संवादात सहभागी होण्यासाठी दैनिक 'पुढारी'च्या 'pudharionline' या अधिकृत फेसबुक पेजला लाईक करावे. तसेच, pudharionline यू-ट्यूब चॅनेलला भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT