Uncategorized

कोल्हापूर : गांधीनगरमध्ये महाराष्ट्र राज्य जनहित पत्रकार संघातर्फे रुग्णांना फळे वाटप

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'गांधीनगर : 'जनहितासाठी एक पाऊल पुढे' हे ब्रीद घेऊन केवळ समाजहितासाठी कार्य करणाऱ्या महाराष्ट्र राज्य जनहित पत्रकार संघातर्फे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्ताने गांधीनगर येथे 'पत्रकार दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने रुग्णांची सेवा करण्याच्या उद्देशाने येथील शासकीय वसाहत रुग्णालयातील सुमारे १०० रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.

गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि करवीर पूर्व भागातील उंचगाव, गडमुडशिंगी, गांधीनगर, वळिवडे, चिंचवाड, सरनोबतवाडी या गावातील सरपंच यांच्या सहभागाने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य जनहित पत्रकार संघाच्या वतीने आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. पाहुण्यांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. यावेळी चिंचवाडच्या लोकनियुक्त सरपंच सौ. श्रद्धा पोतदार, गडमुडशिंगीच्या सरपंच सौ. अश्विनी शिरगावे, वळिवडे सरपंच सौ. रुपाली कुसाळे, माजी सरपंच श्रीमती पूनम परमानंदानी, शिवसेना ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी आपल्या मनोगतात या पत्रकार संघटनेने पत्रकारदिनी घेतलेल्या समाजसेवेचे कौतुक करून विधायक कार्यात या संघटनेचा मोठा सहभाग असल्याचे सांगितले. पत्रकार संघटनेमार्फत आयोजित केलेल्या या कार्यक्रमास सर्वांनीच शुभेच्छा दिल्या.

यावेळी उंचगाव सरपंच मधुकर चव्हाण, गांधीनगर सरपंच संदिप पाटोळे सरनोबतवाडीच्या सरपंच सौ. शुभांगी अडसूळ, माजी सरपंच रितू लालवाणी, माजी सरपंच सोनी सेवलानी, होलसेल व्यापारी असो.चे उपाध्यक्ष सेवाराम तलरेजा, रिटेल व्यापारी असो.चे अध्यक्ष दिलीप कुकरेजा, किशन वधवा, भरत रोहिडा, रमेश वाच्छाणी, रमेश कुकरेजा, ग्रा. पं. सदस्य सनी चंदवानी, निवास तामगावे, सौ. लक्ष्मी धामेजा, माजी पं. स. सदस्या सौ. सरिता कटेजा तसेच कन्हैय्या माखिजा, दिपक पोपटानी दिपक फ्रेमवाला, सुनील पारपाणी, किशोर कामराज, सतीश राजपुतआदी मान्यवर उपस्थित होते. शाससकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या पॉल यांचेही या कार्यक्रमास सहकार्य लाभले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन महाराष्ट्र राज्य जनहित पत्रकार संघटनेचे अध्यक्ष नंद ठाकूर, उपाध्यक्ष महादेव वाघमोडे, सचिव राजेंद्र ढाले,खजानीस राजाराम चौगुले सदस्य महादेव सुतार, प्रशांत दळवी, अशोक ठाकूर अन्य सदस्यांनी केले होते. आभार राजू यादव यांनी मानले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT