Uncategorized

कन्नड : बारा महिने पोसलेल्‍या आल्‍याची ट्रॉली पुराच्या पाण्यात पलटी, लाखोंचे नुकसान

Pudhari News

कन्नड (औरंगाबाद) : पुढारी वृत्‍तसेवा

तालुक्यातील ब्राह्मणी नदीत आद्रक (आले) भरलेला ट्रॅक्टर नदी पार करत आसताना ट्रॉली पलटी झाली. अचानक पाणी वाढल्याने ट्रॉलीमधील तीस क्विंटल जवळपास आद्रक संपूर्ण वाहून गेले. यामुळे शेतकऱ्याचे जवळपास लाख रूपयाचे नुकसान झाले.  

अधिक वाचा : सुशांत सिंह राजपूतचा नोकर दीपेश सावंतला पोलिस कोठडी

तालुक्यातील हिवरखेडा गौतळा येथील शिवदास टिकाराम जाधव यांची गट नं ८२ मध्ये शेती आहे. त्यांनी आपल्या शेतात आद्रकचे पिक घेतले होते. दिवसभर मजूरांनी आद्रक खोदुन ती ट्रक्टरच्या ट्रॉली मध्ये भरली होती. ही आद्रक धुन्या करिता नियोजित जागी नेण्यासाठी ट्रक्टर नदीतून नेण्यात आला. त्यावेळी ब्राह्मणी नदीला पाणी कमी होते. मात्र नदीच्या वरील भागात गौतळा अभयारण्यात दुपारी जोरदार पाऊस झाला होता. यामुळे अचानक नदीच्या पाण्यात वाढ झाली. त्याच वेळी ट्रॉली पलटी झाल्याने काही उपाय योजना करण्याच्या आतच डोळ्यासमोर आद्रक वाहून गेली. 

अधिक वाचा : रुग्‍णालयाच्या गच्चीवरून उडी मारत कोरोनाबाधित रूग्‍णाचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न 

यावेळी शेतकऱ्याचा मुलगाही तेथे उपस्‍थित होता. आपल्या शेतातील आद्रक विकण्या अगोदरच वाहून जात आसल्याचे पाहून त्याला भोवळ आल्‍याने तो जमिनीवर पडला. सदर शेतकऱ्याच्या शेतात जाण्यायेण्याच्या नदी मार्गावर पुल नसल्याने नदीच्या पाण्यात ट्रॉली पलटी झाली आहे. या घटनेचा मजूर मुलांनी मोबाईलमध्ये शूट केल्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. तालुक्यातील शेतकरी बांधवांकडून या झालेल्‍या नुकसानीची हळहळ व्यक्त केली जात आहे. 

अधिक वाचा : संजय राऊतांनी कंगनावर डागली तोफ! म्हणाले…

बारा महिन्यापासून पोटच्या मुला प्रमाणे संभाळ केलेल्या आद्रक पिक पाण्यात वाहून गेल्याने वर्ष भरापासून बघितलेल्या शेतकऱ्याच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे. शेतात मागील वर्षी जून महिन्यात एक एकर आद्रकची लागवड केली होती. लॉकडाउन सुरु आसल्याने उन्हाळयात आद्रक काढता आली नाही. त्यात मागील महिन्यात झालेल्या सततच्या पावसाने काही आद्रक सडून गेली. यामुळे झालेला खर्च कसाबसा निघणार होता. त्यात ट्रॉली पलटी झाल्याने संपूर्ण नुकसान झाले असल्याची माहिती शेतकऱ्याच्या मुलाने दिली आहे. सदर शेतकऱ्याचे नुकसान झाल्याने त्यास नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT