Uncategorized

Jalgaon News : विशेष नवजात शिशु काळजी कक्षाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

गणेश सोनवणे

जळगाव : ज‍िल्हा सामान्य रूग्णालयातील वार्ड क्रमांक 6 मधील व‍िशेष नवजात श‍िशु काळजी कक्षाचे (Special Newborn Care Unit- SNCU) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले. एसएनसीयू युनिटच्या माध्यमातून ज‍िल्ह्यातील नवजात बाळांची वैद्यकीय काळजी सक्षमपणे घेतली जाईल. अशा व‍िश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

जिल्हा नियोजन 5 कोटी 57 लाख रूपयांच्या न‍िधीतून ज‍िल्हा रूग्णालयात एसएनसीयू युनिट कार्यरत करण्यात आला आहे. या युन‍िटचे उद्धाटन व लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अध‍िकारी अंकिंत, ज‍िल्हा शल्य च‍िक‍ित्सक डॉ.क‍िरण पाटील, डॉ.ग‍िर‍िष ठाकूर, डॉ.शैलेजा चव्हाण व डॉ. इंद्रानी म‍िश्रा आदी यावेळी उपस्थ‍ित होते.

व‍िशेष नवजात शिशु काळजी कक्षाची यावेळी पालकमंत्र्यांनी पाहणी केली. श‍िशु कक्षातील अत्याधु‍निक अद्यावत सुव‍िधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

एसएनसीयू युनिटच्या नूतनीकरणासाठी ज‍िल्हा वार्ष‍िक योजनेतून 5 कोटी 57 लाखांचा न‍िधी मंजूर करण्यात आला होता. या न‍िधीतून एसएनसीयू व‍िभागाचे नूतनीकरण करण्यात आले. या कक्षात 45 युनिट कार्यरत आहेत. सध्या या व‍िभागात अत्याधुनिक कृत्रीम श्वासाचे मशीन व रेड‍ियंट वॉर्मर उपलब्ध आहेत. ज्याद्वारे कमी वजनांच्या व कमी दिवसांच्या नवजात बालकांवर सर्व प्रकारच्या उपचारासाठीच्या सुविधा उपलब्ध आहेत.

जन्मजात न रडलेले बाळ व अध‍िक प्रमाणात कावळि असणाऱ्या बाळांवर उपचार सुविधा उपलब्ध आहेत. तसेच इतर आजारांवरही उपचार उपलब्ध असून ज्यासाठी खासगी रूग्णालयांमध्ये खूप खर्च येतो त्या सर्व सुव‍िधा व‍िनामूल्य या कक्षात नवजात बालकांसाठी उपलब्ध असल्याची माह‍िती ज‍िल्हा शल्य चिक‍ित्सक डॉ.क‍िरण पाटील यांनी यावेळी ‍दिली.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT