Uncategorized

Jalgaon Crime : पोलीस अधीक्षकांचे आदेश; दोघे दोन वर्षासाठी हद्दपार

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात गुन्हेगारांनी अशरक्ष: थैमान मांडले आहे. चोऱ्या घरफोड्या, मोटरसायकलची चोरी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या चोरांना आळा बसावा यासाठी दोन वर्षासाठी शहरातील दोन गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीमधील आकाश उर्फ डोया मुरलीधर सपकाळे, वय 30 टोळी प्रमुख गणेश उर्फ काल्या रवींद्र सोनवणे, वय 20 टोळी सदस्य या दोघां विरोधात शनिपेठ पोलीस स्टेशन, जिल्हा पेठ पोलीस स्टेशन, जळगाव शहर पोलीस स्टेशन, जळगाव तालुका पोलीस स्टेशन, एरंडोल पोलीस स्टेशन अशा पाच ठिकाणी खून करण्याचा प्रयत्न, दरोडा, दंगल, घातक हत्यार बाळगणे, गंभीर दुखापत करणे, मारामारी, शिवीगाळ, दमदाटी, मालमत्तेचे नुकसान या अंतर्गत व यांच्या टोळीतील इसमाविरुद्ध एकूण तेरा गंभीर गुन्हे दाखल आहेत. या दोघांनी शहरात ठिकठिकाणी दहशत पसरवली आहे. त्यांच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहाय्यक फौजदार संजय शेलार, अश्विन हडपे, परेश जाधव, राहुल पाटील, अनिल कांबळे, राहुल घेटे, किरण वानखेडे यांनी प्रस्ताव तयार केला. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी प्रस्तावाच्या चौकशी अंतिम दोघांना दोन वर्षाकरिता जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश पारित केले आहेत.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT