वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा : हायवा गाडी आणि स्विफ्टची धडक होऊन झालेल्या अपघातात अंबड तालुक्यातील सोनकपिंपळगावचे सरपंच शंकर धुमाळ यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अंबडहुन सोनकपिंपळगाव येथे जात असताना जालना-वडीगोद्री मार्गांवरील झिरपी फाट्याजवळ शनिवारी रात्री ७ च्या सुमारास ही घटना घडली. (Jalana)
अंबडहुन सोनकपिंपळगाव येथे स्विफ्ट कारने जात असताना झिरपी फाट्याजवळ रोडला उभ्या असलेल्या हायवा गाडीला (क्रमांक एम एच 34 डी बी 0776) मागून स्विफ्ट कार (क्रमांक एम एच 20 9407) धडकली. या अपघातात शंकर धुमाळ (वय 38 रा. सोनकपिंपळगाव ता. अंबड) यांचा जागीच मृत्यू झाला. अंबड तालुक्याच्या राजकारणातील उमदे व्यक्तिमत्व त्याच बरोबर काही काळ त्यांनी पत्रकार क्षेत्रात काम केले असून असे शंकर धुमाळ यांचे अपघाती निधन झाल्याने राजकीय क्षेत्र, मित्र परिवार व नातेवाईक व अंबड तालुक्यात मोठी शोककळा पसरली आहे. शंकर धुमाळ यांच्या पश्चत आई, पत्नी दोन मुली व नातेवाईक असा मोठा परिवार आहे. सोनकपिंपळगाव गावावर मोठी शोककळा पसरली आहे. (Jalana)
हेही वाचा